या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना संसर्गाच्या भीतीने घराबाहेर पडण्याच्या वादातून कांदिवलीत सख्ख्या भावाने धाकटय़ा भावाची हत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास कांदिवलीतील पोयसर परिसरात घडली. दुर्गेश ठाकूर(२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील खासगी कंपनीत नोकरी करत होता. मात्र करोनाच्या संसर्गामुळे तो मुंबईत आपल्या भावाकडे परतला. भाऊ राजेश केशकर्तनालयात मजुरी करतो. बुधवारी सकाळी राजेश आणि त्याची पत्नी भाजीपाला खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत होते. तेव्हा दुर्गेशने त्यांना रोखले. बाहेर पडू नये, अशी विनंती त्याने दोघांना केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत राजेश आणि त्याची पत्नी घराबाहेर पडले. खरेदी करून आल्यानंतर राजेश आणि दुर्गेश यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात दुर्गेशने वहिनीच्या श्रीमुखात भडकावली. ते पाहून राजेशने स्वयंपाक घरातील तवा दुर्गेशच्या डोक्यात घातला. हा घाव दुर्गेशच्या वर्मी बसला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून राजेशला अटक केल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू काबे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of a young man on the verge of leaving the house abn
First published on: 27-03-2020 at 01:07 IST