मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने त्याचे उद्घाटन होणार  आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी परिषद समाजमाध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. राज्यातील डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात कार्यरत विविध घटक तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाइन उपस्थित राहता येणार आहे. या परिषदेसाठी http://www.facebook. com/onemdhealth  यावर प्रश्न पाठवता येतील. या परिषदेत कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. ही परिषदूेङ्मेंँं१ं२ँ३१ं यांच्या ट्विटर, फेसबुक व यूट्यूबhttps://you tube.com/c/CMOMaharashtra  वरूनही पाहता येईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My doctor conference today akp
First published on: 05-09-2021 at 00:23 IST