शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील गटमेळाव्यात बुधवारी (२१ सप्टेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा आणि शिंदे गटावर हल्ला चढवला. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय. “शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते,” असं म्हणत खोचक टोला लगावला. तसेच उद्धव ठाकरे आधी मंत्र्यांची बैठक घ्यायचे, आता गटप्रमुखांची बैठक घेतात इथपर्यंत आले आहेत, असा चिमटा काढला. ते गुरुवारी (२२ सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी अमित शाहांनी जमीन दाखवा असं वक्तव्य केल्याचं म्हणाले. मात्र, त्याचा अर्थ त्यांना कळाला नाही. शाहांना जमिनीवर या असं म्हणायचं होतं. आता हे म्हणतात आम्ही ‘आसमान’ दाखवू. उद्धव ठाकरे असं कोणाच्या जीवावर म्हणत आहेत? शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते.”

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

“…म्हणून उद्धव ठाकरे शिवसेनेत आले”

“तेव्हापासून शिवसेना मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करत होती. त्यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. ते १९९९ मध्ये शिवसेनेत सक्रीय झालात. मी मुख्यमंत्री झालो आणि त्यांना घरून कोणीतरी सांगितलं की राणे मुख्यमंत्री झाले, तूही कार्यरत राहा, मुख्यमंत्री होशील. म्हणून ते शिवसेनेत आले. तोपर्यंत ते शिवसेनेत सक्रीय नव्हते. एवढी आंदोलनं झाली, शिवसैनिक लढत होते, मार खात होते, एन्काऊंटर होत होते, तुरुंगात जात होते तेव्हा हे कोठे होते?” असा सवाल नारायण राणेंनी विचारला.

हेही वाचा : “यांना कानाखाली नाही मारायची मग काय…”; नितेश राणेंनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १२ सेकंदांचा ‘तो’ Video

“संपूर्ण आयुष्यात विरोधकाच्या कानफडात तरी मारली का?”

“उद्धव ठाकरेंना ६२ वं वर्ष सुरू आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विरोधकाच्या कानफडात तरी मारली का? पक्षवाढीसाठी कधी संघर्ष केला का? ते काहीच न करता सरळ मुख्यमंत्रीपदावर आले. तेव्हा मी म्हणालो होतो की हे आयत्या बिळावर नागोबा आहेत,” अशीही टीका राणेंनी केली.