‘एनपीसीआय’च्या एकीकृत देयक प्रणालीवर २१ बँकांचे व्यवहार

घरातून बाहेर पडताना खिशात एक रुपयाही न ठेवता, केवळ स्मार्टफोनच्या साहाय्याने संपूर्ण बाजारहाट, येण्या-जाण्याचा प्रवास, इतकेच काय वेगवेगळ्या देयकांचा भरणा, मोबाइल रिचार्ज, दानकर्म वगैरे सर्व शक्य करणाऱ्या ‘डिजिटल बँकिंग’चे पर्व प्रत्यक्षात साकारलेले पाहता येणार आहे. खऱ्या अर्थाने रोकडरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी देशातील २१ बँकांना नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय) विकसित एकीकृत देयक प्रणालीवर (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, यूपीआय) कार्यान्वयनाला मंजुरी दिली आणि गुरुवारपासून या बँकांच्या सेवांना सुरुवातही झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे या २१ बँकांमध्ये सहकार क्षेत्रातील एकमेव टीजेएसबी बँकेचा समावेश आहे.  रिझव्‍‌र्ह बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांनी ११ एप्रिल २०१६ रोजी ‘यूपीआय’ या क्रांतिकारी प्रणालीची घोषणा केली. गेल्या काही महिन्यांमध्ये, प्रामुख्याने बँकांच्या कर्मचाऱ्यांपुरते प्रायोगिक तत्त्वावर यूपीआय प्रणालीची पाहणी केल्यानंतर आता ते २१ बँकांच्या ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहे.

rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
indian economy marathi news (1)
“भारत ७ टक्के विकासदर गाठेल, पण तो पुरेसा नाही कारण…”, RBI च्या चलनविषयक समितीच्या सदस्यांची ठाम भूमिका!
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती

गुगल प्ले स्टोअरवर यूपीआय-समर्थ मोबाइल अ‍ॅप पुरविणाऱ्या बँका: आंध्र बँक, अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय महिला बँक, कॅनरा बँक, कॅथोलिक सीरियन बँक, डीसीबी बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, टीजेएसबी सहकारी बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कर्नाटक बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, साऊथ इंडियन बँक, विजया बँक आणि येस बँक.

इश्युअर्स : ‘इश्युअर्स’ म्हणून आयडीबीआय बँक आणि आरबीएल बँक यांचा समावेश ग्राहकांना वर नमूद केलेले या बँकांपैकी कोणत्याही बँकेचे यूपीआय-समर्थ अ‍ॅप डाऊनलोड करून त्यांचे बँक खाते त्याच्याशी संलग्न करता येईल.

 

भारतासारख्या खंडप्राय देशात मोबाइल अ‍ॅपद्वारे क्षणार्धात पैसे पाठवणे आणि स्वीकारण्याच्या सुविधेसारखा प्रयत्न जगात इतरत्र कुठेही झालेला नाही. आता प्रारंभिक मंजुरी मिळविलेल्या बँकांद्वारे यूपीआय अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध केले जाणार आहे.

– ए. पी. होटा, मुख्य कार्यकारी अधिकारी, एनपीसीआय