नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५२ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रसचे नेते गणेश नाईक यांनी शहरावरील आपले वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले. नाईक घराण्याच्या साम्राज्याला सुरूंग लावण्याच्या इराद्याने शिवसेना-भाजप महायुती याठिकाणी मैदानात उतरली होती. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले तरी, नवी मुंबईकरांनी महायुतीच्या पारड्यात चांगले यश टाकले आहे. तर काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत फक्त १० जागाच जिंकता आल्या. मात्र, बहुमतासाठी लागणारा ५६ जागांचा जादुई आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नाही.  त्यामुळे सत्तेच्या चाव्या काँग्रेस आणि  अपक्षांच्या हाती गेल्या आहेत. बहुमताची जमवाजमव करून नाईक यांनी सत्तेत येण्याची किमया साधली, तर ते पालिकेवर २५ वर्षे सत्ता टिकवणारे राज्यातील एकमेव नेते ठरतील.
नवी मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेने ३७ जागांवर यश मिळवले, तर भाजपला अवघ्या सहा जागांवरच विजय प्राप्त करता आला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शिवसेनेचा भाव पुन्हा एकदा वधारण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत पक्षाविरोधी बंड केलेल्या तब्बल ४० बंडखोरांची सेनेला चिंता होती. मात्र, या बंडखोरांचा कोणताही फटका महायुतीला बसला नाही. निकाल जाहीर होताना प्रत्येक टप्प्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस पहायला मिळत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतिम पक्षीय बलाबल
शिवसेना – ३७
भाजप – ७
कॉंग्रेस – १०
राष्ट्रवादी – ५२
अपक्ष – ५
 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai mahanagar palika election result
First published on: 23-04-2015 at 10:17 IST