मुंबई : केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी आणखी काही कागदपत्रे सादर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्ञानदेव यांनी मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावरील अंतरिम दिलासा देण्याबाबतचा निर्णय न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गेल्या आठवडय़ात राखून ठेवला होता. परंतु समीर यांच्यावर केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ आपल्याला त्यांच्या शाळेतील प्रवेशाचा अर्ज आणि त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मलिक यांच्यावतीने न्यायमूर्ती जामदार यांना करण्यात आली आहे.

समीर हे जन्माने मुस्लीमच आहेत. शिवाय समीर त्यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनुसूचित जातीचे असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. आपला हा आरोप सिद्ध करण्यासाठीच समीर यांच्या शाळेतील प्रवेशाचा अर्ज आणि त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची परवानगी देण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik in bombay high court against sameer wankhede father defamation suit zws
First published on: 18-11-2021 at 03:54 IST