अमली पदार्थ प्रकरणात आर्यन खान व अरबाज मर्चंटच्या अटकेच्या वेळी के. पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित असल्याचा आरोप करत राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एनसीबी) कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते  व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शंका उपस्थित केल्यानंतर आता संचालक समीर वानखेडे यांनी एनसीबीने वर्षभरामध्ये केलेल्या कामाची माहिती दिलीय.

टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना वानखेडे यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. “मागील वर्षभरामध्ये कोणत्या कारवाया केल्या? तुम्ही एखाद्या व्यक्तीला नजरेसमोर ठेऊन किंवा प्रसारमाध्यमाकंडून प्रसिद्धी मिळावी म्हणून कारवाया करता का?,” असा प्रश्न वानखेडे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “आम्ही सरकारी कर्मचारी आहोत. त्यामुळे हे ड्रग्सचं रॅकेट उद्धवस्त करणं आमचं काम आहे,” असं वानखेडे म्हणाले.

तसेच पुढे बोलताना वानखेडे यांनी, “मी एनसीबीचा विभागीय संचालक म्हणून सांगू इच्छितो की आम्ही एका वर्षामध्ये १०६ प्रकरणांचा तपास केलाय.यामध्ये ३०० जणांना अटक झालीय ज्यात ड्रग्स पुरवणारे, त्याचा सौदा करणारेआम्ही दोन कारखानेही उद्धवस्त केलेत ज्यातील एक डोंगरीमध्ये होता.बराच माल आम्ही जप्त केलाय. तसेच आर्थिक व्यवहारांसंदर्भातही बरीच माहिती आमच्या हाती लागलीय. वेगवेगळ्या प्रकारचे अंमलीपदार्थ आम्ही जप्त केलेत.१२ वेगवेगळ्या गँग आम्ही पकडल्यात,” असंही सांगितलं.

नक्की वाचा > Aryan Khan Drugs Case: “वानखेडे साहेबांनी…”; भाजपा नेत्याने केला NCB कनेक्शनसंदर्भातील खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही फार प्रोफेशन आणि सक्षम संस्थेमध्ये काम करतो. आमच्यासाठी कायदा महत्वाचा आहे. त्यामुळेच कोणी तो गुन्हा केलाय किंवा तो कोणत्या स्थानी आहे यापेक्षा कोणीही गुन्हा करुन अंमलीपदार्थांविरोधी कायद्याचा भंग केल्यास त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल,” असं वानखेडे म्हणाले.