राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शिवसेना, काँग्रेसविरोधात नाराजीचा सूर; नवाब मलिक म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काही आजी माजी आमदारांनी तक्रारी मांडल्या. शिवसेना आणि काँग्रेस मतदारसंघातील काम करत नसल्याची तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली.

NCP-Congress
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शिवसेना, काँग्रेसविरोधात नाराजीचा सूर; नवाब मलिक म्हणाले…(Photo- ANI)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुका, निवडणुकांची रणनिती, ओबीसींचं राजकीय आरक्षण या विषयांवर चर्चा झाली. तसेच बैठकीत काही आजी माजी आमदारांनी तक्रारी मांडल्या. सत्तेत असलेले शिवसेना आणि काँग्रेस मतदारसंघातील काम करत नसल्याची तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“तीन पक्षांचं सरकार असताना प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना झुकतं माप देते. दोन पक्षांचं सरकार असताना हीच तक्रार होती. कधी कधी एका पक्षाचं सरकार असताना पण तक्रार असते. तीन पक्षाचं सरकार असल्याने प्रत्येक प्रश्न सुटेल असं नाही. जे आमदार आहेत किंवा पराभूत उमेदवार आहेत. यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देतील.”, असं राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. “काही जिल्ह्यांमध्ये आम्ही पालकमंत्री असताना किंवा आमचं वर्चस्व असताना काँग्रेसच्या तक्रारी येऊ शकतात. काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचं वर्चस्व असताना आमच्या किंवा शिवसेनेच्या तक्रारी होऊ शकतात. जिथे जिथे एक पक्षाचं सरकार आहे. त्या ठिकाणी सुद्धा आमदारांचे मतभेद असतात. प्रत्येक आमदाराला आणि नेत्यांना असं वाटतं आपल्या मतदारसंघातील कामं जास्त झाली पाहीजेत. हा काही मोठा प्रश्न असं आम्ही मानत नाही.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती होताच फडणवीसांनी काढली मनोहर पर्रीकरांची आठवण; म्हणाले…

“आपल्या बऱ्याच काळ निवडणुका टाळता येत नाहीत. एखादा कायदा करून सर्व पक्षांना एकजूट करून, एकमत करून आरक्षण देता येते का?, हे पाहावं लागेल. ही सगळी परिस्थिती असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे. करोनाची स्थिती नियंत्रणात असताना ते निवडणुका घेऊ शकतात. अशी भूमिका ते मांडत आहेत. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला निवडणुका घेतल्या पाहीजेत. जर दुसरा पर्याय उरला नाही. तर रिक्त झालेल्या ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाचा झाला आहे”, असं राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. “जो पर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी आमची भूमिका आहे. पण एखादा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यास पक्षाचा निर्णय असा राहील”, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp leader and minister nawab malik on congress shivsena rmt

ताज्या बातम्या