राज्य सामायिक प्रवेश परीक्षा विभागाचे स्पष्टीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शैक्षणिक वर्ष २०१७-१८साठी राज्यात एमबीबीएस व दंतवैद्यकीयप्रमाणेच इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे प्रवेशही ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा’ (नीट)च्या गुणांच्या आधारे होणार असल्याचे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा विभागाने स्पष्ट केले. यामुळे आरोग्य विज्ञान शाखांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.

३ डिसेंबर २०१५च्या राजपत्रानुसार एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएस्सी (नर्सिग), बीएएसएलपी आणि बीपी अँड ओ या अभ्यासक्रमांना व्यावसायिक आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचा दर्जा देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्र सरकारने व राज्य सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या धोरणांनुसार करण्यात येत असल्याचे राज्य प्रवेश परीक्षा विभागाने स्पष्ट केले.

आरोग्य विज्ञानाशी संबंधित या अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘नीट’नुसार व्हावेत अशी मागणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे एक महिन्यापूर्वीच राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयआयटीतून ६२५ विद्यार्थ्यांना नोकऱ्या

मुंबई : आयआयटी मुंबईत सुरू असलेल्या प्लेसमेंट हंगामात पहिल्या पाच दिवसांमध्ये ६२५ हून अधिक विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. ही भरतीय प्रक्रिया १५ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. यंदाच्या भरती प्रक्रियेत नोकऱ्या मिळत असल्या तरी त्यांना मिळणाऱ्या पगाराचा आकडा हा दरवर्षीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे सूत्रांकडून समजते.

यंदा आयआयटीमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत.  यंदा जपानमधील कंपन्यांची संख्याही वाढल्याचे आयआयटीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet exam health science courses
First published on: 08-12-2016 at 00:10 IST