मुंबई : 'माथेरानची राणी' म्हणून प्रसिद्ध असलेली 'मिनी टॉय ट्रेन' पर्यटकांचे खास आकर्षण आहे. मात्र पावसाळ्यात नेरळ आणि अमन लॉजदरम्यानची प्रवासी सेवा खंडित करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. १० जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येईल. या दरम्यान माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू राहतील. मुंबईकरांना जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान ओळखले जाते. पावसाळ्यात येथील निसर्गदृश्य पाहण्यास पर्यटकांची मोठया संख्येने गर्दी जमते. नेरळ ते माथेरान धावणारी 'मिनी टॉय ट्रेन' पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र आहे. मात्र मध्य रेल्वेने नेरळ ते अमन लॉज दरम्यानची प्रवासी सेवा १० जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हेही वाचा - मुंबई : राखीव साठ्यामुळे पाणीसाठा वाढला, एकूण पाणीसाठा आता १८ टक्क्यांवर माथेरान येथून रोज सकाळी ८.२०, सकाळी ९.१०, सकाळी ११.३५, दुपारी २, दुपारी ३.१५, सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ही गाडी अमन लॉज अनुक्रमे सकाळी ८.३८, सकाळी ९.२८, सकाळी ११.५३, दुपारी २.१८, दुपारी ३.३३, सायंकाळी ५.३८ वाजता पोहोचेल.अमन लॉज येथून रोज सकाळी ८.४५, सकाळी ९.४५, दुपारी १२, दुपारी २.२५, दुपारी ३.४०, सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी ९.०३, सकाळी ९.५३, दुपारी १२.१८, दुपारी २.४३, दुपारी ३.५८, सायंकाळी ६.०३ वाजता पोहोचेल.शनिवारी-रविवारी विशेष गाडी माथेरान सकाळी १०.०५, दुपारी १.१० वाजता सुटेल. ही गाडी अमन लॉज येथे सकाळी १०.२३ दुपारी १.२८ वाजता पोहोचेल. तसेच अमन लॉज येथून विशेष गाडी सकाळी १०.३०, दुपारी १.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी १०.४८, दुपारी १.५३ वाजता पोहचेल. हेही वाचा - थकबाकीदार विकासकाच्या नव्या परवानग्यांवर गदा? झोपडीवासियांची भाडे थकबाकी साडेसहाशे कोटींवर सोमवारी ते शुक्रवारपर्यंत विशेष गाडी अमन लॉज येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल आणि माथेरान येथे सकाळी १०.४४ वाजता पोहोचेल. तसेच माथेरान येथून दुपारी १२.२५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे दुपारी १२.४३ वाजता पोहोचेल.