scorecardresearch

Premium

मुंबई : राखीव साठ्यामुळे पाणीसाठा वाढला, एकूण पाणीसाठा आता १८ टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे राखीवसाठा वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता पाणीसाठा वाढला आहे.

Increased water storage mumbai
मुंबई : राखीव साठ्यामुळे पाणीसाठा वाढला, एकूण पाणीसाठा आता १८ टक्क्यांवर (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे राखीवसाठा वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता पाणीसाठा वाढला आहे. सध्या सातही धरणांत ११ टक्के पाणीसाठा असला तरी राखीवसाठा धरून १८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांत मिळून सध्या केवळ ११.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. मात्र सध्या असलेला पाणीसाठा हा केवळ २५ जूनपर्यंत पुरेल इतकाच आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिका प्रशासनाने भातसा व उर्ध्व वैतरणा धरणातील राखीवसाठा वापरण्याकरीता राज्य सरकारला आधीच पत्र पाठवले होते. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने त्याकरीता मंजुरी दिली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे पाणी पुरणार आहे. राखीवसाठा गृहीत धरून सध्या १८.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

naupada gas supply cut off, gas supply cut off in naupada for 1 hour, mahanagar gas company thane
नौपाड्यात तासभरासाठी घरगुती गॅस पुरवठा ठप्प, शेकडो ग्राहकांना बसला फटका
navi mumbai water supply, navi mumbai municipal corporation no control on water distribution, water intake from morbe dam
नवी मुंबई : मोरबे धरणातून पाण्याचा वारेमाप उपसा अन् मनमानी वितरणामुळे पालिकेचे जल नियोजन विस्कळीत
13 civilians lost their lives electric currents farm fences
वन्य प्राण्यांपासून बचावासाठी शेतीच्या कुंपणात सोडलेल्या जिवंत विद्युत प्रवाहामुळे वर्षभरात १३ नागरिकांनी गमावला जीव
navi mumbai municipal corporation, action against societies wasting water
पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या सोसायटींचा शोध; दरडोई २०० लिटरहून अधिक वापराच्या वसाहतींचा नव्याने शोध

हेही वाचा – मुंबईः रिक्षा भाड्यावरून वादानंतर प्रवाशावर अनैसर्गिक अत्याचार; अज्ञात चालकाविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा

सात धरणातून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पावसाला सुरुवात होऊन पुरेसा पाऊस धरणक्षेत्रात पडेपर्यंत वेळ लागणार आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर पाण्याची पातळी वाढायला लागेपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे.

हेही वाचा – मुंबई : केईएममध्ये हिमोफिलिया रुग्णांना एकाच छताखाली उपचार

सातही धरणांत मिळून सध्या १ लाख ६१ हजार २९७ दशलक्ष लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. तर राखीवसाठा उपलब्ध झाल्यामुळे उर्ध्व वैतरणा धरणातून ६२ हजार दशलशलीटर आणि भातसा धरणातून ७५ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा अधिकचा मिळणार आहे. त्यामुळे पाणीसाठा २ लाख ६८ हजार दशलक्षलीटरपर्यंत उपलब्ध आहे. हा साठा १८.६७ टक्के आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increased water storage due to reserved water the total water storage in mumbai is now at 18 percent mumbai print news ssb

First published on: 07-06-2023 at 13:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×