तोटय़ातील रेल्वे मार्ग बंद करण्याचा रेल्वे बोर्डाचा आदेश झुगारून देऊन नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. इतकेच नाही, तर माथेरानच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी आणि पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन आता रात्रीही चालविण्याचा प्रयत्न रेल्वे करणार आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सांगितले की, तोटय़ात सुरू असलेले रेल्वे मार्ग बंद करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले असून नेरळ-माथेरान ही मिनी ट्रेनही तोटय़ात चालविण्यात येत आहे. वर्षांला १६ कोटी रुपये तोटय़ात हा मार्ग सुरू ठेवण्यात येत आहे. मात्र यंदा वेगवेगळे प्रयोग करून हा तोटा कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणजे अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू करण्यात आली. तसेच सध्या नेरळ-माथेरानदरम्यान चालविण्यात येणारी मिनी ट्रेन पाच डब्यांची असून तिला आणखी एक डबा जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक असलेले इंजिन लवकरच उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे सध्या सकाळी पावणेसात ते सायंकाळी साडेपाच इतक्याच काळात चालविण्यात येणारी ही गाडी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली तर रात्री नऊ वाजेपर्यंत चालविण्याचा आमचा प्रयत्न राहील. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून २० किमी अंतराच्या या रेल्वे मार्गाचे रूळ बदलण्याचे काम वर्षभरात पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
नेरळ-माथेरान गाडी रात्रीही धावणार?
तोटय़ातील रेल्वे मार्ग बंद करण्याचा रेल्वे बोर्डाचा आदेश झुगारून देऊन नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. इतकेच नाही, तर माथेरानच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी आणि पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन आता रात्रीही चालविण्याचा प्रयत्न रेल्वे करणार आहे.
First published on: 23-11-2012 at 03:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neral matheran train will run in night