अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतील निवडणुकीत सोमवारी नवेच नाट्य उघडकीस आले. मतमोजणीच्यावेळी सुमारे ६०० मतपत्रिका मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या लक्षात आले. पैकी २०० मतपत्रिका या बोगस असल्याचे प्राथमिक तपासात आढळल्याचे समजते. उर्वरित मतपत्रिकाही बोगस असण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर हे याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची मुदत रविवारी संध्याकाळी संपली. त्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईत मतमोजणी सुरू करण्यात आली. नाट्य परिषदेचे महाराष्ट्रात १५ हजार मतदार आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर मतदारसंख्येपेक्षा जास्त मतपत्रिक तिथे आल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्व मतपत्रिकेंची छाननी करून बोगस मतपत्रिका बाहेर काढण्यास सुरूवात करण्यात आली. ६०० मतपत्रिका जास्त असल्याचे अधिकाऱयांच्या लक्षात आले. जास्त मतपत्रिका आढळल्यानंतर मतमोजणीचे काम थांबविण्यात आले.
बोगस मतपत्रिकांमुळे ही संपूर्ण निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी ‘नटराज’ पॅनलच्या विनय आपटे यांनी केली. तर ‘उत्स्फूर्त’ पॅनलचे मोहन जोशी यांनीही निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाले असून, ऐनवेळी नियम बदलण्यात आले, हे सगळेच अतिशय चुकीच असल्याचे म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2013 रोजी प्रकाशित
नाट्य परिषदेच्या निवडणुकीत नवे ‘नाट्य’; ६०० मतपत्रिका बोगस
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतील निवडणुकीत सोमवारी नवेच नाट्य उघडकीस आले. मतमोजणीच्यावेळी सुमारे ६०० मतपत्रिका मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या लक्षात आले.
First published on: 18-02-2013 at 03:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New twist in drama council election found 600 hundred bogus voting sheets