मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने मुंबईमध्ये निर्भया पथकाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात हे पथक सक्रिय राहणार असून १०३ क्रमांकाद्वारे तातडीने या पथकाची मदत मिळणार आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालक मंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख, खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत निर्भया पथकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबईमधील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हे पथक सक्रिय राहणार आहे. हे पथक तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई करण्याचे आणि तक्रारींवर आधारित कारवाई करण्याचे काम करत असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!

‘हे पथक समाजकंटक, महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार आहे. तसेच जनजागृती आणि शिक्षण देण्याचंही काम पथकाकडून केले जाईल. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन कार्यक्रमांच्या माध्यमामधून सुरक्षित वातावरण तयार करण्याचे काम हे पथक करणार आहे,’ असे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. निर्भया पथकाचा नक्कीच फायदा होईल, असे नांगरे पाटील म्हणाले. मुंबई सुरक्षित शहर आहे. पण या नवीन पथकाच्या माध्यमातून महिलांसंदर्भातील तक्रारींबद्दलची प्रक्रिया गतिमान होईल, असेही ते म्हणाले.

१०३ या विशेष क्रमांकावर दूरध्वनी केल्यास निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे, अत्याचार होत असल्यास हस्तक्षेप करून तिला सुरक्षितता देणे, गुन्ह्यांचा त्वरित तपास करणे, न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करणे हे मुंबई पोलीस दलाचे प्राधान्याचे काम आहे, असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले. महिलांवरील अत्याचार थांबवणे, तत्काळ प्रतिसाद देऊन महिलांना संरक्षण देण्यासाठी निर्भया पथके काम करणार असून  मुंबईतील ९१ पोलीस ठाण्यात अशी पथके स्थापन करण्यात येत आहे. जाणीव जागृतीसाठी आज निर्भया फेसबुक, निर्भया पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. निर्भया संकल्पगीत, निर्भया लोगोचे अनावरण अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेप्रती लोकमनात जागृती करण्यात आली. १०३ या क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. यासाठी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना डेटा सुविधासह आयफोन फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.