मनसेकडून काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला चढवण्यात आल्यानंतर संजय निरूपम आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा आम्ही करारा जवाब देऊ, असा इशारा देण्यात आला होता. यावरून काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी स्वपक्षीयांनाच खडे बोल सुनावले आहेत. मनसेने काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली ते कृत्य चुकीचेच होते. मात्र, महात्मा गांधीजींचे अनुयायी असलेले मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते प्रतिहल्ला करण्याच्या धमक्या केव्हापासून द्यायला लागले, असा बोचरा सवाल नितेश राणे यांनी ट्विटवरून विचारला. तसेच या हल्ल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘बांगड्या’ दाखवून मनसेचा प्रतिकात्मक निषेध केला होता. परंतु, अशाप्रकारे बांगड्या दाखवणे, हा महिलांचा अपमान नव्हे का? काँग्रेस पक्षाच्या मुल्यांचा आणि विचारसरणीचा अपमान नव्हे का?, असा सवालही नितेश यांनी विचारला.

‘हेराफेरी’ सिनेमातील प्रसंग ट्विट करत नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंची खिल्ली

यापूर्वीही मालाड येथे मनसेच्या सुशांत माळवदे यांना मारहाण झाल्यानंतर नितेश राणे यांनी संजय निरूपम यांच्यावर आगपाखड केली होती. मराठी माणसाला झालेली मारहाण खपवून घेणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. काँग्रेसला आपली ओळख फक्त उत्तर भारतीयांचा पक्ष अशीच ठेवायची आहे का? काँग्रेसला मराठी माणसांच्या मतांचीही गरज आहे. पण तुर्तास तसे दिसत नाही, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन छेडल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या राजकीय व्यक्तीने त्यांना समर्थन दिले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

अनधिकृत फेरीवाल्यांकडून मराठी माणसाला झालेली मारहाण खपवून घेणार नाही- नितेश राणे