मुंबईतल्या या भागात Kiss कराल तर सावधान! कारण…

अश्लिल चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांना इथले रहिवासी कंटाळले असून त्यांना प्रतिबंध करण्यासाठी रहिवाशांनी हा उपाय केला आहे

No kissing zone in mumbai
मुंबईतल्या एका सोसायटीतल्या रहिवाश्यांनी प्रेमी युगुलांना कंटाळून हा उपाय केला आहे.

तुम्ही आत्तापर्यंत नो पार्किंग झोन ऐकला असेल, नो हॉकिंग झोन ऐकला असेल, पण नो किसींग झोन कधी ऐकला आहे का? पण हो, असाही एक झोन आहे आणि परदेशात नाही बरं का…आपल्या मुंबईतच. या मुंबईतल्या NO KISSING ZONE ची सध्या जोरदार चर्चा आहे.

तर झालं असं की, बोरिवली पश्चिम येथे असलेल्या जॉगर्स पार्कजवळ तरुण जोडपी भर रस्त्यात अश्लील कृत्य करत असतात. यामुळे या विभागात राहणारे नागरिक त्रस्त झाले असून अश्या जोडप्यांवर बंधन घालण्यासाठी त्या नागरिकांनी रस्त्यावरच NO KISSING ZONE असं लिहिलं आहे. बोरिवलीच्या चिकुवाडीतील सत्यम शिवम सुंदरम सोसायटी जवळ हे जॉगर्स पार्क आहे.

या ठिकाणी नागरिक व्यायाम करायला, फिरायला येतात. मात्र करोना काळातल्या निर्बंधांमुळे काही जोडपी या पार्कजवळच दुचाकीवर किंवा चारचाकीमध्ये बसून अश्लिल चाळे करत असतात. ह्या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती असून त्याच्या मध्यभागी एक गार्डन तयार करण्यात आलं आहे. या ठिकाणी जोडपी अश्लील कृत्य करताना नेहमीच दिसत असतात. या जोडप्यांना इथले रहिवासी कंटाळले असून त्यांना प्रतिबंध करण्यासाठी रहिवाशांनी सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यावर NO KISSING ZONE असं लिहिलं आहे.

विशेष म्हणजे नागरिकांकडून असं लिहिल्याचा परिणाम देखील झाला आहे. याचा परिणाम म्हणून आता मात्र या ठिकाणी कमी जोडपी दिसत आहेत असं येथील रहिवासी सांगत आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No kissing zone in mumbai going viral on social media vsk

ताज्या बातम्या