मुंबई : कुर्ला परिसरात येत्या मंगळवार व बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘एल’ विभागामध्ये पवई निम्नस्तरीय जलाशय येथे १८०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीचे दुरुस्ती काम १९ जानेवारी सकाळी ८ वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. २० जानेवारी २०२१ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण २० तास हे काम चालणार आहे. या कालावधीमध्ये एल विभागातील काही परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

या गळती दुरुस्ती कालावधीत एल विभागातील प्रभाग क्रमांक १५६, १६१, १६२ व १६४ मधील उदयनगर, मारवाह रस्ता दोन्ही बाजू, तेजपाल कंपाऊंड, टिळकनगर, अनिस कंपाऊंड, राजीवनगर, मिल्लतनगर, वायर गल्ली, संहिता संकुल, जरीमरी, सफेद पूल, सत्यानगर पाइपलाइन मार्ग, शांतीनगर, शिवाजीनगर, तानाजीनगर, खाडी क्रमांक ३, लालबहादूर शास्त्रीनगर या संपूर्ण परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.

आवाहन काय? : परिसरातील नागरिकांनी या दुरुस्ती कामापूर्वी पुरेशा पाण्याचा साठा करावा. दुरुस्ती कालावधीत पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.