घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग करण्यात आला आहे. नव्या किमती मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा तडाखा बसला आहे. गुरुवारी पेट्रेल-डिझेलच्या किंमती काहीशा कमी झाल्याने मिळालेला दिलासा अल्पजिवी ठरला आहे. मोदी सरकारने यापूर्वीच दहा लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना सिलिंडरवर मिळणारे अनुदान रद्द केले आहे.