आरोपीला जामिनानंतर पुन्हा अटक
कांदिवलीच्या पोईसर येथे सहा वर्षीय मुलीच्या विनयभंगाप्रकरणी जामिनावर सुटलेल्या बाबुलाल पटेल (५२) याला पोलिसांनी सोमवारी बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. वैद्यकीय चाचणीत त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पटेल याला पुन्हा अटक केली आहे.
१२ डिसेंबर रोजी कांदिवलीच्या पोईसर येथील चाळीत राहणाऱ्या एका सहा वर्षांच्या मुलीच्या विनयभंगाप्रकरणी पोलिसांनी त्या चाळीचा मालक बाबूलाल पटेल (५३) याला अटक केली होती. त्याला लगेच १३ डिसेंबरला जामिनावर सोडले होते. सोमवारी पोलिसांनी भगवती रुग्णालयातून या मुलीचा वैद्यकीय चाचणी अहवाला प्राप्त झाला. त्यात मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पटेल याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पटेल हा मुले आणि नातवांसह या चाळीत राहतो. त्याने खेळण्याच्या बहाण्याने या मुलीला घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
कांदिवलीतील मुलीचा विनयभंग नव्हे, तर बलात्कार
आरोपीला जामिनानंतर पुन्हा अटक कांदिवलीच्या पोईसर येथे सहा वर्षीय मुलीच्या विनयभंगाप्रकरणी जामिनावर सुटलेल्या बाबुलाल पटेल (५२) याला पोलिसांनी सोमवारी बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. वैद्यकीय चाचणीत त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पटेल याला पुन्हा अटक केली आहे.
First published on: 25-12-2012 at 04:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not miss behave the rape in kandivli