पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने उद्या (शुक्रवार) एकदिवसीय बंद पुकारला आहे. या बंदमध्ये स्कूल बस, खासगी बस, खासगी कॅब, ट्रक, टेम्पो आदी सहभागी होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीअतंर्गत आणाव्यात, इंधनाचे दर सहा महिन्यातून एकदा निश्चित करावेत, मुंबईतल्या सर्व टोल नाक्यावर टोलमाफी द्यावी, राज्यातील सर्व टोलनाक्यावर स्कूल बसचा प्रवास मोफत करावा, विमा हप्त्यात कपात करावी, स्कूल बसच्या चेसिसवरील एक्साईज ड्यूटी माफ करावी, आरटीओकडून होणारी वार्षिक वाहन तपासणी बंद करून ती स्कूल बस सेफ्टी समितीकडून करावी, शाळेभोवत पार्किंगला जागा मिळावी, खड्डेमुक्त रस्ते आदी मागण्यांसाठी बंदची हाक देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One day strike of school bus private cab truck tempo tourist driver for various demands
First published on: 19-07-2018 at 16:45 IST