मोटारसायकलवरून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतला. जॉन मंगेशकर (२४) असे या तरुणाचे नाव असून तो विक्रोळी पार्कसाइट येथे राहणारा आहे. विक्रोळी डेपोजवळ मोटारसायकलीवरून स्टंट करत असतांना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या अपघातात त्याचे दोन मित्र जखमी झाले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जॉन व त्याचे दोन मित्र अविनाश कसबे व वासुदेव भालेराव यांच्यासमवेत त्याच्या मोटारसायकलीवरून मंगळवारी रात्री  फिरायला निघाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास ते विक्रोळी डेपोजवळील कैलास कॉम्प्लेक्सच्या रोड नंबर १७ वर मोटारसायकलीवरून स्टंट करत होते. जॉन ही मोटारसायकल चालवत होता. एका चाकावरून चालविण्याचा (विली) स्टंट तो करत होता. त्याने हेल्मेट घातले नव्हते. या स्टंटबाजीत त्याची मोटारसायकल जवळच उभ्या असलेल्या एका खासगी बसवर आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की जॉनचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One died by doing bike stunt
First published on: 09-05-2013 at 03:06 IST