इमारतीवरील बांबुच्या परांतीवरुन पडून ४ वर्षीय लहानगीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळी लालबागच्या मेघछया इमारतीत ही दुर्घटना घडली.
 लालबागच्या मेघछाया इमारतीच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. त्यासाठी इमारतीवर बांबुच्या परांती उभारण्यात आल्या होत्या. या इमारतीत चरण सिंग हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. सोमवारी दुपारी त्यांची दोन मुले बबिता (४) आणि विनोद (१०)हे या बांबूच्या परांतीवर खेळत होते. अचानक त्या दोघांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यांना त्वरीत केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना बबिताचा मृत्यू झाला. तर विनोदची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.