हिरेन हत्या प्रकरण : सचिन वाझेंना जामीन नाकारला

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या बंगल्याबाहेरील स्फोटके प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणी विशेष न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत दिली. त्याचवेळी आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याच्या कारणास्तव जामिनाची मागणी करणारा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिरेन यांच्या हत्येसाठी आरोपींना ४५ लाख रुपये देण्यात आल्याचे उघड झाले आहे. मात्र हे पैसे कोणी दिले शोधायचे असल्याचा दावा करत एनआयएने आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांच्या मुदतवाढीची मागणी केली होती. तर आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून वाझेंनी जामिनासाठी अर्ज केला होता. या दोन्हींवर विशेष न्यायालयाने गुरुवारी निर्णय देताना एनआयएची आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी मान्य केली. तर आरोपपत्र दाखल करण्यासाठीची कायद्याने नमूद केलेली ९० दिवसांची मुदत संपण्याआधी आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून जामीन देता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने वाझेंचा जामीन अर्ज नाकारला.

वाझेंचा अर्ज हा गुणवत्तेवर आधारित नाही आणि या अर्जावर सुनावणी घेऊन न्यायालयाचा वेळ वाया गेला आहे, असे न्यायालयाने वाझेंचा अर्ज फे टाळाना नमूद केले. सचिन वाझे यांनी दूरचित्रसंवाद माध्यमाद्वारे तळोजा कारागृहातून स्वत:; युक्तीवाद केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One month extension for indictment to nia hiren murder case akp
First published on: 06-08-2021 at 01:10 IST