मुंबई : विक्रोळी येथील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमधील २३ व्या मजल्यावरील उद्वाहन कोसळून बुधवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर तीनजण जखमी झाले. विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील उद्वाहनाचे काम बुधवारी सुरू होते. मात्र अचानक दुपारी २.३० च्या सुमारास उद्वाहन २३व्या मजल्यावरून खाली कोसळले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन कामगाराची सुटका केली. मात्र शिवम जैस्वाल (२०) हा कामगार या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास प्रयत्न करून त्याला उद्वाहनाबाहेर काढले. त्यानंतर त्याला परिसरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Landing of Manishnagar flyover is dangerous
नागपूर : मनीषनगर उड्डाणपुलाची ‘लँडिंग’ धोकादायक
Mobile theft in Local train
प्रवाशाच्या व्हिडिओमुळं मुंबई ट्रेनमधील मोबाइल चोर पकडला आणि एका मृत्यूचंही गूढ उकललं
ram mandir ayodhya dham railway stion viral video
अरेरे! अयोध्या धाम रेल्वेस्थानकावरील ‘तो’ VIDEO पाहून संतापले युजर्स; म्हणाले, “थर्ड क्लास लोक…”