मित्रांमध्ये नित्याची असणारी चेष्टामस्करी जोगेश्वरीतल्या एका विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतली. चेष्टेमुळे संतप्त झालेल्या मित्राने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी जोगेश्वरीच्या बेहरमापाडा बाग येथे ही घटना घडली.
येथील एका खासगी शिकवणीसाठी आलेली मुले बुधवारी संध्याकाळी एकत्र जमली. या शिकवणीसाठी वासिम सैय्यद (१६) हा विद्यार्थी वारंवार गैरहजर राहात असे. त्यावरून इरफान कुरेशी (१६) याने त्याची मस्करी करायला सुरुवात केली. ही चेष्टामस्करी सहन न झाल्याने संतप्त झालेल्या वासिमने त्याला मारहाण केली. या मारहाणीत वसीमने मारलेला फटका इरफानच्या वर्मी लागल्याने तो खाली कोसळला. घाबरलेल्या मित्रांनी शिक्षकांच्या कानावर हा प्रकार घातला. त्याला त्वरीत नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी वासिमला अटक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
चेष्टामस्करीत विद्यार्थ्यांने जीव गमावला
मित्रांमध्ये नित्याची असणारी चेष्टामस्करी जोगेश्वरीतल्या एका विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतली. चेष्टेमुळे संतप्त झालेल्या मित्राने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी जोगेश्वरीच्या बेहरमापाडा बाग येथे ही घटना घडली.
First published on: 11-01-2013 at 04:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One student loss his life as in funny thinks