मुंबई : ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व मिळवण्यासाठी वर्गणी भरण्याच्या नावाखाली ई-मेलद्वारे लिंक पाठवून ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ओटीटीवरील कार्यक्रम पाहण्याकडे वाढत चाललेला कल हेरून सायबर भामटे आता या बहाण्याने नागरिकांशी संपर्क साधून त्यांची लूट करत आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांत अशा तीन प्रकरणांना तक्रारदारांची पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

पहिल्या प्रकरणात वरळी येथे ४५ वर्षीय महिलेला अशाच प्रकारची लिंक प्राप्त झाली होती. त्या ‘नेटफ्लिक्स’साठी दरमहिना ४०० रुपये वर्गणी भरत होत्या. त्यांना ई-मेलवर ‘नेटफ्लिक्स’च्या नावाने संदेश आला होता. त्यात पुढील महिन्यांची वर्गणी भरण्यासाठी लिंक देण्यात आली होती. त्यांनी क्रेडिट कार्डची माहिती दिल्यानंतर त्यांना ओटीपी क्रमांक आला होता. तक्रारदार महिलेने लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडलेल्या फॉर्मवर ओटीटी क्रमांकही भरल्यानंतर त्यांच्या खात्यातून अडीच लाख रुपयांचे व्यवहार झाले. त्यांनी तात्काळ  बँकेला दूरध्वनी करून कार्डमधील व्यवहार बंद करण्यास सांगितले. याप्रकरणी ११ जानेवारीला वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
How does fraud on name of investment happen
विश्लेषण : गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक कशी होते? व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, टेलिग्राम संदेशांपासून सावध कसे राहावे?
hardik pandya marathi news, krunal pandya marathi news
पंड्या बंधूंना बदनामीची धमकी
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

सुरक्षारक्षक एजन्सी चालवणाऱ्या ४६ वर्षीय महिलेचीही अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे. त्यांनाही ‘नेटफ्लिक्स’च्या नावाने सायबर भामटय़ांनी लिंक पाठवली होती. त्यांनीही क्रेडिट कार्डची माहिती दिल्यानंतर त्यांच्या खात्यावरूनही सव्वा लाख रुपये लंपास केले. या प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तिसऱ्या घटनेत अल्टामाउंट रोड येथे राहणाऱ्या ६६ वर्षीय महिलेचीही एक लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांनीही क्रेडिट कार्ड क्रमांक व सीव्हीव्ही क्रमांक प्राप्त झालेल्या लिंकवर नोंदवला होता. त्यांच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचे आवाहन

सायबर फिशिंगचा हा एक प्रकार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सामान्य नागरिकांना जाळय़ात ओढण्यासाठी सायबर भामटे नवनवीन क्लृप्तय़ाचा वापर करीत आहेत. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म लोकप्रिय होत असताना आरोपी त्याच्याच नावाने खोटय़ा लिंक पाठवून फसवणूक करीत आहेत. पण कोणतीही रक्कम भरण्याऐवजी नागरिकांनी त्याची खात्री करावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.