१९३९ ते १९९२ कालखंडातील ५७३ अंक उपलब्ध

मनोहर महादेव केळकर संपादित ‘वाङ्यमशोभा’ या मासिकाने मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. दर्जेदार साहित्य आणि लेखकांचा सहभाग असलेले हे मासिक सलग ५५ वर्षे प्रकाशित झाले. मराठी साहित्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या ‘वाङ्मयशोभा’ मासिकाच्या ४८ हजार पानांना ‘ई-बुक’चे कोंदण लाभले आहे. १९३९ ते १९९२ पर्यंतचे ५७३ अंक आता माहितीच्या महाजालात आणण्यात आले असून ते मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

१९३७ मध्ये ‘मनोहर ग्रंथमाला’ या नावाने प्रकाशन व्यवसाय सुरू केलेल्या केळकर यांनी पु. रा. भिडे, तात्या ढमढेरे, गं. भा. निरंतर या मित्रांच्या मदतीने ‘वाङ्मयशोभा’ मासिकाची सुरुवात केली. भिडे आणि केळकर संपादक असलेल्या या मासिकाचे जनकत्व एक/दोन अंकानंतर केळकर यांच्याकडे आले आणि तो वसा त्यांनी शेवटपर्यंत सांभाळला. ना. सि. फडके, श्री. म. माटे, वामन मल्हार जोशी, वि. स. खांडेकर, पु. भा. भावे यासारखे ज्येष्ठ लेखक ‘वाङ्मयशोभा’मध्ये सुरुवातीपासूनच लिहीत होते. मान्यवरांबरोबरच उदयोन्मुख लेखकांनाही केळकर यांनी अंकात लिहिते केले. वाद, चर्चा, परिसंवाद, मुलाखती, राजकीय, ललित लेख, पुस्तक परीक्षण, कथा, कादंबरी, कविता, महिलाविषयक साहित्य असे या मासिकाचे स्वरूप होते.

मनोहर केळकर यांचे सुपुत्र अविनाश आणि नात डॉ. अस्मिता पटवर्धन यांनी ‘वाङ्मयशोभा’चा हा ठेवा जतन करण्याचा आणि साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचविण्याचा विचार केला. ‘बुकगंगा डॉट कॉम’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्याशी झालेल्या चर्चेतून ‘वाङ्मयशोभा’ चा ठेवा ‘डिजिटायझेशन’ स्वरूपात जतन करण्याची कल्पना पुढे आली आणि दोन वर्षांपूर्वी हे काम पूर्ण झाले. http://www.bookganga.com या संकेतस्थळावर ‘वाङ्मयशोभा’ मासिकांचा हा खजिना पाहता आणि वाचता येणार आहे.

‘डिजिटायझेशन’च्या या कामामुळे एक अमूल्य ठेवा उपलब्ध झाला असून आमचे हे काम एक वर्षभर चालले होते. काही अंक खूप जीर्ण झालेले होते. मात्र डिजिटायझेशनचे काम करताना त्याची गुणवत्ता राखण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. बदलत गेलेली मराठी भाषा, छपाईचा फॉण्ड यासह त्या त्या काळातील महत्त्वाचे विषय आणि संदर्भ यांचे प्रतिबिंब या ५३ वर्षांच्या कालखंडातील ‘वाङ्मयशोभा’च्या या ठेव्यात पाहायला मिळते.

मंदार जोगळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुकगंगा डॉट कॉम