मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या स्मरणार्थ कुरार गाव येथे उभारलेला स्तंभ उद्ध्वस्त करणाऱ्या विकासकाला तात्काळ अटक करण्याची सूचना महापौर सुनील प्रभू यांनी शुक्रवारी प्रशासनाला केली.
माजी नगरसेवक अजित रावराणे यांच्या पुढाकाराने करकरे यांच्या स्मरणार्थ कुरार व्हिलेज येथे स्मृती स्तंभ उभारण्यात आला होता. विकासकामात अडथळा बनलेला हा स्तंभ विकासकाने तोडून टाकल्याची माहिती शिवसेना नगरसेवक सुनील गुजर यांनी शुक्रवारी सभागृहाला दिली. हा स्तंभ हटविण्यास परवानगी देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. विनोद शेलार, श्रीकांत कवठकर, प्रशांत कदम, तृष्णा विश्वासराव यांनी या प्रकाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
या  प्रकरणी संबंधित विकासकाला तात्काळ अटक करावी, अशी सूचना करून सुनील प्रभू म्हणाले की, विकासकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ गृह मंत्री आर. आर. पाटील आणि पोलीस आयुक्तांशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order to arrest builder who demolished hemant karkare smarak
First published on: 09-02-2013 at 04:43 IST