करोनाच्या संकटासोबतच अजून एक संकट सध्या देशाच्या अनेक राज्यातल्या नागरिकांना सतावत आहे ते म्हणजे इंधन दरवाढ. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. त्यामुळे घराघरात कधीकाळी आम्ही ४०-५० रुपयांनी पेट्रोल-डिझेल भरलं आहे, असे संवाद ऐकू येऊ लागले आहेत. देशातल्या काही मेट्रो सिटीजमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. मुंबईही त्याला अपवाद नाहीच.

काल सलग अकराव्या दिवशी देशातल्या चार मोठ्या शहरांमध्ये इंधनांचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर भाव १०७.८३ रुपये असून डिझेलचा दर ९७.४५ रुपयांवर स्थिरावला आहे. देशातल्या मेट्रो सिटींच्या तुलनेत मुंबईतला इंधनाचा भाव सर्वाधिक आहे.

कोणत्या मेट्रोसिटीमध्ये पेट्रोल-डिझेलचा प्रतिलीटर दर काय आहे?

दिल्ली
पेट्रोलः १०१.८४ रुपये
डिझेलः ८९.८७ रुपये

मुंबई
पेट्रोलः १०७.८६ रुपये
डिझेलः ९७.४५ रुपये

चेन्नई
पेट्रोलः १०२.४९ रुपये
डिझेलः ९४.३९ रुपये

कोलकत्ता
पेट्रोलः १०२.०८ रुपये
डिझेलः ९३.०२ रुपये

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडून दररोज पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातली क्रूड ऑईलची किंमत आणि डॉलर-रुपया यांच्या दराचं प्रमाण यांच्यावर इंधनाची किंमत ठरते. पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेले बदल त्या त्या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.