प्रसिद्ध पियानो वादक करण जोसेफ (२९ वर्षे) याने शनिवारी सकाळी वांद्रे येथील इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नसल्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. करण हा मूळचा बंगळुरू येथे राहणारा आहे. महिनाभरापूर्वीच तो मुंबईत आला होता व वांद्रे येथे मैत्रीण रिषी शाह हिच्या घरी राहात होता.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने आत्महत्या केली त्यावेळेस त्याची ही मैत्रीण व काही कामगार घरात होते. त्याने अचानक खिडकी उघडली आणि उडी घेतली. त्यानंतर सर्वानी तातडीने खाली धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात नेले. दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  करणचा फोन तपासासाठी न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pianist karan joseph commits suicide
First published on: 10-09-2017 at 01:01 IST