शहरातील उपनगरीय रेल्वेपासून ते मेट्रोसेवेपर्यंत आणि रिक्षा-टॅक्सीच्या भाडय़ापासून ते मोनोरेलच्या वेळापत्रकापर्यंत सर्वच वाहतुकीच्या साधनांची अद्ययावत माहिती मुंबईकरांच्या हाती देणाऱ्या एम-इंडिकेटरवर आणखी उपयुक्त माहिती मिळणार आहे. उपनगरीय रेल्वेतून प्रवास करताना गाडी पुढील स्थानकात कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार किंवा प्लॅटफॉर्म कोणत्या बाजूला येणार, असे प्रश्न विचारणारा प्रवासी नवखा समजला जातो. मात्र या प्रवाशांना एम-इंडिकेटर ही माहिती पुरवणार आहे. येत्या दोन आठवडय़ांत हे अ‍ॅप अद्ययावत होणार असून या नव्या अपडेट्सची चाचणी शुक्रवारी चर्चगेट-दादर या दरम्यान घेण्यात आली.
एम-इंडिकेटर या अ‍ॅपवर पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्वच मार्गावरील गाडय़ांचे अद्ययावत वेळापत्रक उपलब्ध असते. मात्र एखादी गाडी एखाद्या स्थानकावर नेमक्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल, हे अ‍ॅपमध्ये कळत नाही. त्यामुळे नवख्या प्रवाशांचा गोंधळ होतो. त्याचप्रमाणे प्रवाशांना अनेकदा सहप्रवाशांचा ‘असहकार’ सोसावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

’एम-इंडिकेटर हव्या असलेल्या स्थानकांदरम्यानची हवी असलेली गाडी निवडावी
’गाडीवर क्लिक केल्यानंतर गाडी कोणत्या स्थानकात किती वाजता पोहोचणार, याची माहिती असलेली स्क्रीन समोर दिसेल आणि स्क्रीनवर डावीकडे कोपऱ्यात प्रत्येक स्थानकाच्या बाजूला ती गाडी त्या स्थानकात कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, ही माहिती असेल.
’मध्यभागी छोटय़ा बाणांच्या साहाय्याने प्लॅटफॉर्म कोणत्या दिशेला येईल, हे दर्शवण्यात येणार आहे.
’भविष्यात तिन्ही मार्गावरील प्रवाशांची गैरसोय एम-इंडिकेटरवरील या सुविधेमुळे टळणार आहे.
’सहप्रवाशाचा हेटाळणीचा स्वराचा त्रास वाचणार.

१५ दिवसांत ‘अपडेट’
या पर्यायाची चाचणी चर्चगेट-दादर या दरम्यान शुक्रवारी झाली. मात्र त्यात काही त्रुटी आढळल्याचे एम-इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके यांनी स्पष्ट केले. मात्र या त्रुटींवर मात करत येत्या दोन आठवडय़ांत नवीन अपडेट प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Platform info is now on m indicator
First published on: 12-07-2015 at 05:24 IST