विलेपाल्र्यातील मैदानाला उन्हाळी सुट्टीत टाळे; ‘पुलं’चे नाव न देण्यासाठी उद्घाटन लांबणीवर

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे नाव द्यावे लागू नये म्हणून काम पूर्ण होऊनही विलेपार्ले येथील मालवीय रस्त्यावरील विशेष मुलांसाठी विकसित करण्यात आलेल्या उद्यानाला ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत टाळे ठोकण्यात आले होते. मुलांसाठी बंदी असली तरी उद्यानाचे प्रवेशद्वार दररोज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमासाठी तासभर खुले केले जाते. मुलांना खेळण्यासाठी बंद असलेले हे मैदान संघासाठी मात्र खुले का केले जाते, असा संतप्त सवाल येथील स्थानिक रहिवासी विचारत आहेत.

Indian Relay Teams Qualify for Olympics
रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ; जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेदरम्यान भारताच्या महिला, पुरुष संघांना यश
mohsin nakki
लाहोर, कराची, रावळपिंडीला पसंती; चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न

मालवीय व नेहरू रस्त्यावरील चौकाला अमराठी अज्ञात व्यक्तीचे नाव दिल्यामुळे संतापलेल्या पार्लेकरांनी किमान इतर रस्ते व उद्यानांना तरी सामाजिक कार्य केलेल्या व्यक्तींचीच नावे मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मालवीय रस्त्यावरील उद्यान विशेष मुलांसाठी विकसित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. उन्हाळी सुट्टय़ांसाठी या मैदानाचे उद्घाटन एप्रिल महिन्याच्या अखेरीस होणे अपेक्षित होते. या उद्यानाला अज्ञात व्यक्तीचे नाव देण्याऐवजी महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीचे- पुलंचे नाव द्यावे, अशी इच्छा पार्लेकरांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे व्यक्त केली होती. मात्र पुलंच्या नावाने कोणताही ‘लाभ’ होण्याची शक्यता नसल्याने या उद्यानाचे काम अपूर्ण असल्याचा बहाणा करत संपूर्ण मैदानालाच टाळे ठोकण्यात आले. त्यामुळे मुलांसाठी खेळण्याची साधने बसवली असतानाही आणि उद्यानाचे ९० टक्के काम होऊनही मे महिनाभर मैदानाचे बंद प्रवेशद्वार लहानग्यांना वाकुल्याच दाखवत राहिले. आता शाळा सुरू होत असताना शेवटच्या शनिवार-रविवारीही मुलांना बंद दरवाजातून दिसणाऱ्या खेळण्यांकडे पाहात समाधान मानावे लागणार आहे.

उद्यानाचे काम अपूर्ण असल्याचे सांगत मुलांना त्यांच्या खेळण्यांपासून वंचित ठेवले जात असले तरी रोज सकाळी सात वाजता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या व्यायाम प्रकारांसाठी मात्र हे उद्यान खुले होते. जिथे हा उपक्रम होतो तिथेही मुले सहज खेळू शकतात. मुलांना लागेल, त्रास होईल असे कोणतेही अवजड सामान उद्यानात नाही. मात्र पार्लेकरांच्या दबावापोटी उद्यानाला नाव देणे भाग पडू नये यासाठी नवाच डाव खेळण्यात आल्याचे पार्लेकर सांगतात. मैदान केव्हा खुले करणार यासंबंधी विचारणा करण्यासाठी वारंवार संपर्क करून व संदेश पाठवूनही के पूर्व विभागाचे साहाय्यक अभियंता देवेंद्रकुमार जैन यांनी प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.

पुलंना मुलांबद्दल आपुलकी होती. त्यामुळे विशेष मुलांसाठी विकसित केलेल्या या उद्यानाला त्यांच्याएवढे समर्पक नाव सापडणार नाही. या उद्यानाच्या अध्र्या भागात सर्व खेळणी बसवून झाली आहेत व उरलेला भाग मोकळा ठेवण्यात आला आहे. मुले रोज या मैदानाकडे येऊन हिरमुसली होऊन परत जातात. शाळेला सुट्टी असतानाही या उद्यानात मुलांना प्रवेश मिळाला नाही, हे दु:खदायक आहे.

– अविनाश परांजपे, रहिवाशी, विलेपार्ले

विलेपार्ले येथे पुलंचे आयुष्य गेले असले तरी या भागात पुलंचे स्मारक म्हणावे अशी एकही सरकारी वास्तू नाही. मालवीय रस्त्यावरील उद्यानाला त्यांचे नाव मिळावे ही इच्छा तर आहेच पण केवळ नाव द्यावे लागू नये म्हणून काम पूर्ण होऊनही ते न झाल्याचा बहाणा करत मुलांना त्यांच्या जागेपासून दूर ठेवण्याचा खेळ पार्लेकरांसाठी नवा आहे.

– प्रमोद मुजुमदार, रहिवासी