एका २८ वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणास वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पीडित तरुणीच्या मित्रावरही गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे.  पीडित तरुणी कलिना येथील एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये काम करते. एका तरुणाशी तिची ओळख आणि शरीरसंबंध निर्माण झाले होते. काही दिवसांनी या तरुणाच्या बाळू नावाच्या अन्य एका मित्राने या तरुणीला संपर्क केला. हे संबंध जगजाहिर करण्याची धमकी देत तो सुद्धा जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध ठेऊ लागला. बाळूने तरुणीच्या बहिणीची भेट घेऊन तिला ही माहिती दिली आणि तिच्याकडेही शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र तिने कुटुंबियांच्या मदतीने तक्रार दाखल केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest man for girl raped
First published on: 20-05-2015 at 12:03 IST