भिवंडीतील कुप्रसिद्ध गुंड साकीब नाचन याच्या हालचालींची पोलिसांना इत्थंभूत माहिती पुरविणाऱ्या एका खबऱ्याने गुरुवारी सकाळी भिवंडीतील गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मोहम्मह शालीन अन्सारी (३०) असे या खबऱ्याचे नाव असून तो ४० टक्के भाजला आहे. त्याला मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अन्सारी याने केलेल्या कृत्यामागील नेमकी कारणे स्पष्ट झाली नसली तरी भिवंडीतील गुन्हे अन्वेषण शाखेच्या एकूण कार्यपद्धतीविषयी या घटनेमुळे प्रश्न उभे राहिले आहेत. भिवंडी परिसरात सिमी संघटनेकडून होणाऱ्या कारवायांची सविस्तर माहिती अन्सारी याच्याकडून गुन्हे अन्वेषण विभागास देण्यात येत होती. या भागात बोरीवली नावाच्या गावात साकीब नाचण रहातो. अतिरेक्यांसोबत असलेल्या कथित सहभागाबद्दल साकीबला यापूर्वी अटकही झाली आहे. विश्व हिंदू परिषदेचे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज रायचा यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणीही नाचणचा सहभाग पोलीस तपासाचा एक भाग होता. यासंबंधी बरीचशी माहिती अन्सारीकडून पोलिसांना दिली जात होती, असे सांगितले जाते. गुरुवारी सकाळी त्याने गुन्हे अन्वेषण शाखेसमोर येत स्वतला पेटवून घेतल्याने गुन्हे शाखेचे काही अधिकारी चौकशीच्या फे ऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, या प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू असून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
खबऱ्याने जाळून घेतल्याने खळबळ
भिवंडीतील कुप्रसिद्ध गुंड साकीब नाचन याच्या हालचालींची पोलिसांना इत्थंभूत माहिती पुरविणाऱ्या एका खबऱ्याने गुरुवारी सकाळी भिवंडीतील गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मोहम्मह शालीन अन्सारी (३०) असे या खबऱ्याचे नाव असून तो ४० टक्के भाजला आहे. त्याला मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published on: 23-11-2012 at 04:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police informer self burn by fire create sensation