अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप दाखल झालेल्या राहुल राज सिंह याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. रुग्णवाहिकेतून डॉक्टरांसह आलेला राहुल अर्धा तास पोलीस ठाण्यात होता. बुधवारी त्याची कसलीही चौकशी करण्यात आली नाही. गुरुवारी त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
प्रत्युषाच्या आत्महत्येला राहुल जबाबदार असून त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, त्याला रोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले. त्यानुसार, बुधवारी सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्याच्या आवारात रुग्णवाहिकेसह दाखल झाला. तपास अधिकाऱ्यांशी त्याचे बोलणे झाले. मात्र, त्याची चौकशी करण्यात आली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2016 रोजी प्रकाशित
प्रत्युषाप्रकरण : राहुलची बांगूरनगर पोलीस ठाण्यात हजेरी
रुग्णवाहिकेतून डॉक्टरांसह आलेला राहुल अर्धा तास पोलीस ठाण्यात होता.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 14-04-2016 at 02:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratyusha banerjee suicide rahul singh