राज्यात सर्वत्र मोसमीपूर्व पाऊस १ आणि २ जूनला कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक असेल. यावर्षी सर्वसाधारणपणे राज्यात ११ जूनला पावसाची सुरुवात होईल. त्याचा परतीचा प्रवास नेहमीपेक्षा थोडा रेंगाळून ८ ऑक्टोबरला सुरु होण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पावसावर पडणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. यावर्षी मराठवाडय़ात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre monsoon rains in early june abn
First published on: 27-05-2020 at 00:41 IST