मुंबई : मुंबईत आत्तापर्यंत डेल्टा प्लसचे ११ रुग्ण आढळले असले तरी शहरात याचा प्रादुर्भाव अजूनही अत्यल्प असल्याचे पालिकेने केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. यात पालिकेने ३७४ नमुन्यांच्या चाचण्या केल्या असूनही एकही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळलेला नाही. डेल्टाचा प्रादुर्भाव मात्र मुंबईत सर्वाधिक असून यातील ८१ टक्के नमुने हे डेल्टाचे आढळले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेत दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्या केल्या आहेत. याचा अहवाल नुकताच पालिकेने जाहीर केला असून यात ३७४ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातील ८१ टक्के म्हणजेच ३०४ नमुने ‘डेल्टाचे असल्याचे आढळले आहे. ‘नाईन्टीन-ए’ (१९अ) उप प्रकारातील २ आणि ‘ट्वेन्टी-ए’ (२०अ) उप प्रकारातील ४ नमुने आणि उर्वरित ६६ नमुने हे सर्वसाधारण करोना विषाणूचे आहेत. पहिल्या चाचण्यांमध्ये डेल्टाचे प्रमाण जवळपास ६८ टक्के आढळले होते.

पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही टप्प्यातील नमुन्यांमध्ये ‘डेल्टा प्लस’ या उपप्रकारातील एकही नमुना आढळलेला नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

दुसऱ्या टप्प्यातील जनुकीय चाचण्यांमध्ये प्रमाण शून्य

कस्तुरबामध्ये पहिल्यांदाच केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग मध्ये १२८ डेल्टा बाधित होते. यातील ९३ नमुने हे मुंबईतील रुग्णांचे असून ४५ पुरुष ४८ स्त्रियांचा समावेश होता. तसेच ५४ व्यक्तींना म्हणजेच ५८ टक्के व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. तर उर्वरित ४२ टक्के म्हणजेच ४० व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. रुग्णांपैकी ४७ रुग्णांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prevalence of delta plus in mumbai is small delta virus akp
First published on: 17-09-2021 at 01:22 IST