शिवसेना ( शिंदे गट ) आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेंनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून या गोष्टी व्हायरल करण्यासाठी फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करण्यात येत होते, असा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीतल म्हात्रेंच्या आरोपांना शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उत्तर दिलं आहे. “त्यांना वाटतं आम्हाला दुसरा काही कामधंदा नाही. आम्हाला त्यांचे व्हिडीओ बनवण्याची गरज नाही. यांनी स्वत:चं नाव आधीच बदनाम केलं आहे. जे लोक ५० खोके खाऊन आपली काम करत आहेत. त्यांचे व्हिडीओ आम्ही कशासाठी बनवू,” असा सवाल प्रियंक चतुर्वेदींनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : शीतल म्हात्रेंची ‘त्या’ व्हिडीओवरून ठाकरे गटावर टीका; म्हणाल्या, “याच्या मागील मास्टरमाइंड…”

“आम्ही जनतेसाठी काम करतो. असे व्हिडीओ व्हायरल झाले असतील, तर त्यासाठी सायबर सेल आहे. सुल्ली डील प्रकरणात सायबर सेलने काम केलं होतं. पण, आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवणे म्हणजे बेशरमपणा आहे,” अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

हेही वाचा : “जर तुम्ही शाखा उद्ध्वस्त करणार असाल, तर…”, राजन विचारेंचा शिंदे गटाला इशारा

याप्रकरणावर आमदार सुनील प्रभू यांनीही भाष्य केलं आहे. “महिलांचा आदर केला पाहिजे, ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ कोणी केले असतील, तर निश्चित पोलीस त्याची चौकशी करतील. मात्र, कोणत्याही महिलेचा व्हिडीओ करून अनादर करू नये,” असे आवाहन सुनील प्रभू यांनी केलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chaturvedi reply sheet mhatre allegation viral video thackeray group prakash surve and sheet mhatre ssa
First published on: 12-03-2023 at 21:59 IST