कांजूर डम्पिंग ग्राऊण्डवर बेकायदा कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याविरोधात स्थानिक नागरिक आणि मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पूर्व द्रुतगती महामार्गावर ‘रास्तारोको’ केला. तसेच मंगेश सांगळेसह बऱ्याचजणांनी मुंडन करून आपला निषेध नोंदविला.
डम्पिंग ग्राऊंड बंद करावे. कचऱ्याचे विघटन करणारी कोणतीही यंत्रणा येथे नसल्याने आसपास दर्गंधी पसरली आहे. त्यामुळे विक्रोळी, पवई, कांजूर, भांडूप आणि नाहूर येथील नागरिकांना याचा त्रास होत आहे. याविरोधात सोमवारी कन्नमवार नगर ते कांजूर डम्पिंग ग्राऊण्डपर्यंत ‘रास्ता रोको’ करीत ‘अंत्ययात्रा’ काढण्यात आली. सोबत महापलिका आणि राज्य शासनचे ‘श्राध्द’ही घालण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2012 रोजी प्रकाशित
कांजूर डम्पिंग ग्राऊण्डविरोधात ‘मुंडन’ आंदोलन!
कांजूर डम्पिंग ग्राऊण्डवर बेकायदा कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
First published on: 16-10-2012 at 07:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against kanjur dumping ground