मुंबईत प्रथमच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात लष्कर आणि मुंबई पोलिसांत नवा वाद निर्माण झाला. लष्कराने मुंबई पोलिसांनी दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी केला. त्याचा निषेध म्हणून दयाळ यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत व्यासपीठावर बसण्यास नकार दिला. मुंबईत आज प्रथमच मुंबई पोलिसांनीच प्रजासत्ताक दिनाचे आयोजित केले होते. हा कार्यक्रम मरीन ड्राईव्ह व शिवाजीपार्कातील क्वीन्स नेकलेसवर झाला.
मुंबई पोलिसांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्यामुळे त्यांना प्राधान्य मिळावे अशी पोलिसांची अपेक्षा होती. मात्र, दुसरीकडे भारतीय लष्कराची कमांड असल्याने त्यांनी दुय्यम स्थान स्वीकारण्यास नकार दिला. तसेच आजचा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आहे व त्यासाठीच आम्ही रात्र-दिवस जीवाची बाजी लावत असतो असे लष्कराचे म्हणणे होते. अखेर या प्रकरणी प्रोटोकॉलनुसार लष्करच महत्त्वाचे ठरते असा कौल देत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मुंबई पोलिसांना माघार घेण्यास सांगितले. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून मुंबई पोलिसांच्या वतीने महासंचालक संजीय दयाळ यांनी व्यासपीठावर बसण्यास नकार दिला.