राज्यातील टोलचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात याच प्रश्नावर बेमुदत उपोषण केलं. त्यानंतर स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच ९ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला राज्यातील टोलनाके जाळून टाकण्याचा इशारा दिला. यानंतर आज (१२ ऑक्टोबर) राज ठाकरेंनी सह्याद्री या मुख्यमंत्री निवासावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे म्हणाले, “मी एकच वाक्य सांगणार आहे. आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संबंधित मंत्री व त्यांच्याबरोबरचे सर्व अधिकारी यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली. परंतु या चर्चेनंतर निर्णयापर्यंत येण्यासाठी उद्या सकाळी माझ्या घरी सकाळी ८ वाजता बैठक ठरली आहे. ती बैठक झाल्यावर काय निर्णय होतो हे मी तुम्हाला १० वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगेन.”

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
eknath shinde raj thackeray (2)
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!

“टोलबाबत काय होणार हे उद्या सकाळी १० वाजता माध्यमांना सांगेन”

“बैठकीत विषयाशी संबंधित लोक असतील. त्याबाबत मी सविस्तर माहिती देणार नाही. यावर काय निर्णय होतो, टोलबाबत काय होणार आहे, हे मी उद्या सकाळी १० वाजता माध्यमांना सांगेन. मी पोलिसांच्या घरांबाबतही चर्चा केली आहे. त्याबाबतही मी उद्या माहिती देईन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर पूर्ण सकारात्मक आहेत,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “उपोषण करणं हे आपलं काम नाही, मी उद्या…”; ठाण्यातील उपोषणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“टोलचा सगळा कॅशमधील पैसा जातो कुठे?”

दरम्यान, याआधी राज ठाकरे म्हणाले होते, “गेल्या चार दिवसांपासून अविनाश जाधव आणि इतर सहकारी ठाण्यात ५ ठिकाणी झालेल्या टोलवाढीच्या विरोधात उपोषणाला बसले होते. मला राज्य सराकरकडून एक पत्र आलंय. त्यात सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या. कुणाकुणाला टोल नाहीये, कुणाला टोल आहे असं त्यात लिहिलं होतं. टोलचा सगळा पैसा कॅशमध्ये आहे. हा पैसा जातो कुठे? याचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? त्यानंतरही रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हा पैसा जातो कुठे? आपण रोड टॅक्स भरतो, तो कुठे जातो? हे कुणालाही कळत नाही. अत्यंत घाणेरड्या परिस्थितीतले रस्ते आपल्या वाट्याला येतात”

“त्याचं काय मातेरं झालंय हे कुणालाच माहिती नाही”

यावेळी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलमुक्त महाराष्ट्रसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांच्या व्हिडीओ क्लिप्स पत्रकारांना ऐकवल्या. “सेना-भाजपा युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी होती. आत्ता काय आहे, त्याचं काय मातेरं झालंय हे कुणालाच माहिती नाही. तेव्हा हे पक्ष काय म्हणाले ते मी एकेक मिनिटाच्या क्लिपवरून दाखवतो”, असं म्हणत त्यांनी व्हिडीओ क्लिप्स ऐकवल्या. यात ही नेतेमंडळी आपलं सरकार आल्यानंतर किंवा अमुक तारखेपर्यंत महाराष्ट्र टोलमुक्त करण्यासंदर्भात दावे करत असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा : जनतेचा टोल आक्रोश मुख्यमंत्र्यांनाही परवडणारा नाही – राज ठाकरे

“…हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे”

“त्यांच्याकडे दर आठवड्याला, दर दिवसाला टोलचे पैसे जात असतात. हे सगळे एवढ्या थापा मारतात. त्यानंतर त्याच त्याच पक्षाला मतदान कसं होतं, हेच माझ्यासाठी अनाकलनीय आहे”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.