scorecardresearch

Premium

मॉडेलची आक्षेपार्ह चित्रफित प्रसिद्ध करण्याचे प्रकरण : राखी सावंतची उच्च न्यायालयात धाव; केली ‘ही’ मागणी

विनयभंगाचा गुन्हा केवळ पुरूषांवर दाखल केला जातो, महिलेवर नाही, असा दावा करून राखी हिने तिच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.

rakhi sawant moves bombay hc to quash the fir filed by model
राखी सावंत (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : एका मॉडेलने दाखल केलेले बदनामीचे आणि विनयभंगाचे प्रकरण, तसेच आरोपपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री राखी सावंत हिने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. संबंधित मॉडेलने सूडाच्या भावनेने आपल्याविरोधात हे खोटे प्रकरण दाखल केल्याचा दावा राखी हिने याचिकेत केला आहे. तक्रारदार मॉडेलने केलेले खोटे आरोप आणि बदनामीकारक विधानांमुळे आपल्याला केवळ वैयक्तिक त्रासच होत नाही, तर आपली अभिनेत्री म्हणून असलेली कारकीर्दही उद्ध्वस्त होत आहे, असा दावाही राखी हिने गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना केला आहे.

हेही वाचा >>> मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्यास भाजपच्या लोकप्रतिनिधिंचा विरोध; अन्य धर्मीय येतील या भीतीने प्रकल्पाला विरोध

29 villages dispute in Vasai-Virar
वसई-विरारमधील २९ गावांचा वाद : गावे समाविष्ट करण्याच्या नव्या निर्णयाला नव्याने आव्हान द्या, विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाची सूचना
pune, Attempted murder, woman, rat poison , in water, crime registered, husband,
पुणे : उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून महिलेचा खूनाचा प्रयत्न; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
crime of rape cannot be cancelled by settlement
समझोत्याने बलात्काराचा गुन्हा रद्द करता येणार नाही…
RAJASTHAN GANG RAPE
धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानमध्ये २० महिलांवर अत्याचार? सखोल चौकशी करण्याचा न्यायालयाचा आदेश!

राखी हिने आपल्याशी संबंधित काही चित्रफिती प्रसिद्ध केल्या आणि आपल्याबाबत बदनामीकारक विधानेही केली, असा आरोप तक्रारदार मॉडेलने करून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रसारमाध्यमांना उपलब्ध करण्यात आलेली ही चित्रफित अश्लील मजकूर असलेली होती, असा दावाही तक्रारदार मॉडेलने केला होता. तिच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी राखी हिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (ए) नुसार, आक्षेपार्ह विधान करून किंवा चित्रफित प्रसिद्ध करून महिलेचा विनयाचा भंग करणे, बदनानी करणे, धमकावण्यासह माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७(ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तथापि, गुन्ह्याची वास्तविकता तपासण्यात आल्यास तो विश्वासार्ह नाही. शिवाय, तक्रारदार मॉडेलशी असलेले सर्व वाद सामंजस्याने सोडवलेले आहेत. असे असताना गुन्हा प्रलंबित ठेवणे ही न्यायालयाचा वेळ वाया घालवण्याची तक्रारदार मॉडेलची खेळी असल्याचा दावाही राखी हिने याचिकेत केला आहे. तसेच, विनयभंगाचा गुन्हा केवळ पुरूषांवर दाखल केला जातो, महिलेवर नाही, असा दावा करून राखी हिने तिच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant moves bombay hc to quash the fir filed by model mumbai print news zws

First published on: 04-12-2023 at 21:46 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×