गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काल निधन झालं. त्यांच्यावर मुंबईच्या दादर इथल्या शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकारण तसंच मनोरंजन क्षेत्रातलेही अनेक दिग्गज उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावली. याच जागेवर लता मंगेशकर यांचं स्मारक उभारावं अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राम कदम म्हणतात, “भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लता दिदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क, दादर, मुंबई इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे त्याच जागी शिवाजी पार्कावर गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादिदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन करावा्यात ही नम्र विनंती मी कोट्यवधी संगीतप्रेमी आणि लतादिदींच्या चाहत्यांच्या वतीने करत आहे. तरी तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेता सन्मान करावा आणि त्याच ठिकामी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ उभारावे”.

Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
What Ram Satpute Said?
“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

या पत्राच्या शेवटी आपलं नाव लिहिताना त्यांनी राम कदम (लतादिदी चाहता व आमदार, भाजपा) असा उल्लेखही केला आहे.