अन्न नागरी पुरवठा विभागाने सुरू केलेल्या धाडीमुळे राजकीय वर्तुळात पुरवठा विभागाच्या कामकाजा विषयी जोरदार चर्चा रंगली आहे. कारण एकीकडे कॅन्टीन मालकांनी थकबाकीदार नेत्यांची तक्रार विधीमंडळ अध्यक्षाकडे केल्यानंतर लगेचच त्याच कॅन्टीन मालकाच्या कॅन्टीवर पडलेली धाड ही नागरी पुरवाठा विभागात आलेल्या तक्रारीवरून पडली का? नेत्यांच्या मर्जीसाठी टाकण्यात आली असी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
बुधवारी २ जानेवारीला नागरी पुरवठा विभागाला आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसमधील गॅस व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरत असल्याची माहिती मिळताच पुरवठा विभागाच्या पथकाने आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये धाड टाकली. त्यानंतर कॅन्टीमध्ये आणण्यात आलेल्या सिंलेंडरच्या पावत्या कॅन्टीन मालकाकडे मिळाल्या नाहीत. ज्या एजन्सी कडून या कॅन्टीनला गॅस पुरवठा केला जातो त्याच्याकडेही याची नोंद नव्हती त्यामुळे हे अधिक गॅसचे बाटले काळ्या बाजारातून आल्याचे समोर आल्यानंतर ९ बाटले जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ठेकेदारासह कॅन्टीनमधील काही कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील आणखी २०० आस्थापने पुरवठा विागाच्या भरारी पथकाच्या हिटलिष्ठवर असल्याचेही समजतेय.
पण एकाच वेळी कॅन्टीन मालकाने नेत्यांच्या खाणावळीच्या थकलेल्या बिलासंदर्भात केलेली तक्रार आणि दुसरीकडे कॅन्टीनवर पुरवठा विभागाची पडलेली धाड याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा झाली आहे. ही धाड राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून तर झाली नाही ना? बऱ्याच ठिकाणी अवैध रीतेन अशा प्रकारे गॅसचा वापर सर्रास सुरू असतो पण तिकडे का कारवाई होत नाही. यासारख्या अनेक चर्चा शिपायापासून ते विविध नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. पण काहीही असो वरच्या मंडळीत गडबड झाली की त्याचे पडसात खाली उमटतात याचा हा नमुना आहे असेच एका लिप्टमनने बोलता बोलता सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2013 रोजी प्रकाशित
आमदार निवासातील कॅन्टीनवर नेत्यांच्या मर्जीसाठी धाड ?
अन्न नागरी पुरवठा विभागाने सुरू केलेल्या धाडीमुळे राजकीय वर्तुळात पुरवठा विभागाच्या कामकाजा विषयी जोरदार चर्चा रंगली आहे. कारण एकीकडे कॅन्टीन मालकांनी थकबाकीदार नेत्यांची तक्रार विधीमंडळ अध्यक्षाकडे केल्यानंतर लगेचच त्याच कॅन्टीन मालकाच्या कॅन्टीवर पडलेली धाड ही नागरी पुरवाठा विभागात आलेल्या तक्रारीवरून पडली का? नेत्यांच्या मर्जीसाठी टाकण्यात आली असी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
First published on: 06-01-2013 at 03:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rate on mla nivas canteen