मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती आणि विशेष समित्यांच्या निवडणुकीत मत वाया घालवणाऱ्या  नगरसेवकांची काँग्रेसने गंभीर दखल घेतली असून फैयाज अहमद, शांतीलाल दोशी, उषा कांबळे आणि शिवा शेट्टी या चार नगरसेवकांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
एका आठवडय़ात समाधानकारक उत्तर न देणाऱ्या नगरसेवकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
फैयाज अहमद यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले पण स्वाक्षरी शिवसेनेच्या उमेदवारापुढे केली होती. दोशी यांनी थेट शिवसेनेच्या उमेदवारालाच मत दिले होते. कांबळे यांनी सत्ताधारी आणि विरोधी उमेदवारांच्या नावापुढे स्वाक्षरी केली तर शेट्टी यांनी अर्जच भरला नव्हता.