जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जात असल्याने दक्षिण व मध्य मुंबईतील काही भागात शुक्रवारी आठ तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून, काही भागात १५ टक्के कपात केली जाईल.
मुंबई सेंट्रल, एम. पी. मिल कंपाउंड, ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, डॉ. ई. मोझेस मार्ग, धोबीघाट क्लार्क रोड येथील पाणीपुरवठा पूर्ण बंद करण्यात येईल. याशिवाय ए, सी, डी, ई आणि जी दक्षिण भागातील अॅनी बेझंट रोड, डॉ. ई. मोझेस रोड येथे १५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. मरोशी- रुपारेल बोगदा प्रकल्पाशी संबंधित वैतरणा जलवाहिनीच्या (मलबार टेकडी जलाशय वाहिनी) जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2014 रोजी प्रकाशित
दक्षिण, मध्य मुंबईत उद्या पाणीकपात
जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जात असल्याने दक्षिण व मध्य मुंबईतील काही भागात शुक्रवारी आठ तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून
First published on: 09-01-2014 at 02:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reduction of water in south central mumbai tomorrow