खंडणीसाठी आपल्याच भाच्याचे अपहरण करणाऱ्या मामासह त्याच्या तीन मित्रांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी दुपारी नागपाडा येथून त्यांनी ६ वर्षीय मुलाचे अपहरण केले होते.
रेहमत जमादार यांचा नागपाडा येथे जरीचा कारखाना असून नागपाडय़ाच्या क्लेअर रोड येथील धनकासल इमारतीत पत्नी आणि तीन मुलांसह राहतात. शनिवारी शाळेला सुट्टी असल्याने तिन्ही मुले घरीच होती, तर लहान अमान इमारतीखाली खेळत होता. जमादार नेहमीप्रमाणे आपल्या कारखान्यात निघून गेले होते. त्यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने  फोन केला आणि अमानचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्याची सुखरूप सुटका करायची असेल तर तीन लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल असे त्या व्यक्तीने सांगितले. जमादार यांनी लगेच घरी चौकशी केली असता खाली खेळणारा अमान गायब असल्याचे समजले. त्यांनी लगेच नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही तपासले असता एक व्यक्ती अमानला घेऊन जात असलेली दिसली. ती व्यक्ती म्हणजे अमानचाच मामा शाहनवाज खान असल्याचे निष्पन्न झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relative kidnapped for three lakh extortion money
First published on: 13-04-2015 at 02:13 IST