खड्डय़ांमुळे बेजार झालेल्या मुंबईकरांची नाराजी दूर करता येत नसल्याने ‘न-राजीनामा’ नाटय़ाचा प्रयोग मंगळवारी महापालिकेत झाला. खड्डय़ांची ‘नैतिक जबाबदारी’ स्वीकारून राहुल शेवाळे यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. अर्थात राजीनामा फेटाळून उद्धव ठाकरे यांनी शेवाळे यांना फटकारले. न्यायालयाने खड्डय़ांची दखल घेऊन दणके दिल्यानंतर शेवाळे यांनी राजीनामा दिला. मात्र, ही वेळ काम करण्याची आहे,असा आदेश देत उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आल्याने राजीनामा दिल्याचे शेवाळे यांनी सांगितले. मुंबईतील रस्ते खड्डय़ात जाण्यास असीम गुप्ता जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी, याचा पुनरुच्चार केला.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2013 रोजी प्रकाशित
खड्डे बुजविण्याच्या नाटकानंतर आता राजीनाम्याचे नाटक
खड्डय़ांमुळे बेजार झालेल्या मुंबईकरांची नाराजी दूर करता येत नसल्याने ‘न-राजीनामा’ नाटय़ाचा प्रयोग मंगळवारी महापालिकेत झाला.
First published on: 31-07-2013 at 02:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resignation drama for fixing potholes