राणेंचा ‘दे धक्का’
नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेली दोन दशके सातत्याने टक्कर देणारे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संदेश पारकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वागणुकीला कंटाळून काँग्रेसमध्ये प्रवेश करून राणे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. कोकणात काँग्रेसने राष्ट्रवादीला दिलेला हा धक्का मानला जातो.
कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर हे राज्याच्या राजकारणात राणे विरोधक म्हणून ओळखले जातात. पारकर यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठराखण केली होती. मात्र आमदार दीपक केसरकर यांच्याशी पारकर यांचे बिनसले. राष्ट्रवादीकडून डावलले गेलेल्या पारकर यांनी राणे यांच्यापुढे मदतीचा हात पुढे केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राणे यांच्या उपस्थितीत पारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पारकर हे काँग्रेसमध्ये आल्याने जिल्ह्य़ात शत्रू उरलाच नाही, असे राणे यांनी या वेळी हसतहसतच सांगितले. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या मनमानीमुळेच आपण काँग्रेस किंवा राणे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले.
गुजरातमधील निवडणुकांवरून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला लक्ष्य करीत प्रसंगी स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. मात्र नुसता शब्द नव्हे तर लेखी आश्वासन देऊनही राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आघाडीचा धर्म पाळलेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी निदर्शनास आणले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2013 रोजी प्रकाशित
संदेश पारकर राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये दाखल!
नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेली दोन दशके सातत्याने टक्कर देणारे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संदेश पारकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वागणुकीला कंटाळून काँग्रेसमध्ये प्रवेश करून राणे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. कोकणात काँग्रेसने राष्ट्रवादीला दिलेला हा धक्का मानला जातो.
First published on: 03-01-2013 at 04:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadesh parkar came to congress from ncp