अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या आरोपाअंतर्गत सध्या सुरू असलेल्या खटल्यात आणखी दोन नव्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यास सत्र न्यायालयाने शनिवारी पोलिसांना परवानगी दिली.
   मात्र या साक्षीदारांना साक्षीसाठी पाचारण करायचे की नाही याचा निर्णय न्यायालय १२ फेब्रुवारी रोजी देणार आहे.